संविधानाच्या प्रतिमधिल पान 31 नुसार…
4 नोव्हेंबर 1948 ते 9 नोव्हेंबर 1948 या काळात संविधान मसुद्याचे प्रथम वाचन झाले.
4 नोव्हेंबर 1948 रोजीच्या सभेत डॉ राजेन्द्र प्रसाद यांनी गांधीजी विषयी ” ज्यांनी आपल्या या हाडामासाच्या मृतवत शरीरात जीवनाचा संचार करविला, ज्यांनी आपण सर्वांना नैराश्य आणि नाउमेदीच्या अंधकारातून आपणास आशा आणि उपलब्धिचा सूर्यप्रकाश दाखवला, ज्यांनी गुलामगिरीतून स्वातंत्र्याच्या मार्गावर आपले नेतृत्व केले” असा उल्लेख केला आणि त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
4 नोव्हेंबर 1948 ते 9 नोव्हेंबर 1948 या काळात संविधान मसुद्याचे प्रथम वाचन झाले. त्यामध्ये मांडल्या गेलेल्या संशोधन प्रस्तावावर चर्चा होवून दुरुस्ती झाली.
15 नोव्हेंबर 1948 रोजी दुसऱ्या वाचनास सुरुवात झाली व प्रत्येक अनुच्छेद वर क्रमवार सविस्तर चर्चा 17 ऑक्टोबर 1949 पर्यंत झाली.
संमविधनाचे तृतीय वाचनासाठी 14 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभा पुन्हा भरली. हे सत्र 26 नोव्हेबर 1949 ला संपले. संविधानावर संविधान सभेच्या अध्यक्षांनी स्वाक्षरी केली आणि संविधान स्वीकृत झाले असे घोषित केले.👏👏👏👏
वरील माहिती भारताचे संविधान (94 व्या सुधारणे पर्यंत अद्ययावत) उद्देशिका, अनुच्छेद 1 ते 395 आणि बारा अनुसूची सहित संपूर्ण संविधान, मिलिंद प्रकाशन वर्धा. याचे आधारे लिहीली आहे.
Dr. Surekha Bhagyawant
Leave A Comment