संविधानाच्या प्रतीमध्ये पान 74 ते पान 85 पर्यन्त मूलभूत हक्काबाबत सविस्तर मांडणी केली आहे.
मूलभूत हक्कांमध्ये अनुच्छेद 12 आणि 13 मध्ये सर्वसाधारण हक्क, मूलभूत हक्कांचे विसंगत असलेले अथवा त्यांचे न्यूनिकरण करणारे कायदे याविषयी स्पष्टीकरण दिलेले आहे.
त्यानंतर समानतेचा हक्क यासंदर्भात अनुच्छेद 14 आणि 15 मध्ये कायद्यापुढे समानता, धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान या कारणावरून भेदभाव करण्यास मनाई.
अनुच्छेद 16 मध्ये सार्वजनिक सेवा योजना च्या बाबींमध्ये समानसंधी,
अनुच्छेद 17 आणि 18 मध्ये अस्पृश्यता नष्ट करणे आणि की किताब नष्ट करणे,
अनुच्छेद 19 स्वातंत्र्याच्या हक्काबाबत तर 20 अपराधाबद्दल च्या दोष सिद्धी बाबत संरक्षण,
अनुच्छेद 21 जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्य यांचे संरक्षण मिळण्याचा हक्क आणि 22 मध्ये विवक्षित प्रकरणी अटक व स्थानबद्धता यापासून संरक्षण
अनुच्छेद 23 आणि 24 शोषणाविरुद्धचा हक्क म्हणजे माणसांचा अपंग व्यापार आणि वेठबिगारी यास मनाई
आणि कारखाने इत्यादींमध्ये बालकांना कामाला ठेवण्यास मनाई,
अनुच्छेद 25 मध्ये सद्सद्विवेकबुद्धी चे स्वातंत्र्य आणि धर्माचे मुक्त प्रकटीकरण, आचरण व प्रचार आणि अनुच्छेद 26 मते धर्मविषयक व्यवहारांची व्यवस्था पाहण्याचे स्वातंत्र्य,
अनुच्छेद 27 मध्ये एखाद्या विशिष्ट धर्माच्या संवर्धना करता कर्ज देण्याबाबत स्वातंत्र्य आणि 28 मध्ये विवक्षित शैक्षणिक संस्था धार्मिक शिक्षण अथवा धार्मिक उपासना यांना उपस्थित राहण्याबाबत स्वतंत्र याबाबत नेमकेपणाने स्पष्टीकरण केले आहे.
वरील माहिती भारताचे संविधान (94 व्या सुधारणे पर्यंत अद्ययावत) उद्देशिका, अनुच्छेद 1 ते 395 आणि बारा अनुसूची सहित संपूर्ण संविधान, मिलिंद प्रकाशन वर्धा. याचे आधारे लिहीली आहे.
Dr. Surekha Bhagyawant
Leave A Comment