संविधानाच्या प्रतीमध्ये पान ७०-७१ मधे संविधानाच्या भाग 1 ‘संघराज्याचे नाव व राज्यक्षेत्र’ याची मांडणी केलेली आहे.
यामध्ये चार अनुच्छेद असून पहिला अनुच्छेद संघराज्याचे नाव आणि राज्य क्षेत्र स्पष्ट करणारा आहे. यानुसार आपल्या संघराज्याचे नाव इंडिया अर्थात भारत हे असेल.
अनुच्छेद दोन मध्ये नवीन राज्य दाखल करून घेणे किंवा स्थापन करणे याविषयी तर अनुच्छेद तीन मध्ये नवीन राज्यांची निर्मिती आणि विद्यमान राज्यांची क्षेत्रे, सीमा अथवा नावे यात फेरफार करण्यासंबंधी मांडणी केलेली आहे.
अनुच्छेद 4 मध्ये पहिल्या व चौथ्या अनुसूची च्या सुधारणेसाठी आणि पूरक, अनुषंगिक व परिणाम स्वरूप बाबींकरिता तरतूद करण्यासाठी अनुच्छेद 2 व 3 खाली करण्यात आलेले कायदे याबाबत मांडणी केलेली आहे.
वरील माहिती भारताचे संविधान (94 व्या सुधारणे पर्यंत अद्ययावत) उद्देशिका, अनुच्छेद 1 ते 395 आणि बारा अनुसूची सहित संपूर्ण संविधान, मिलिंद प्रकाशन वर्धा. याचे आधारे लिहीली आहे.
Dr. Surekha Bhagyawant
Leave A Comment