संविधानाच्या प्रतीमध्ये पान 19 ते 30 मध्ये दिल्यानुसार
भारताच्या संविधानाच्या मसुद्याची चिकित्सा करून आवश्यक ती संशोधने सुचविण्यासाठी ‘संविधान मसुदा चिकित्सा समिती’ नियुक्त करण्यात आली त्यामध्ये खालील सदस्य होते.
१. श्री अल्लादी कृष्णस्वामी अय्यर
२. श्री. एन. गोपालस्वामी अय्यंगार
३. श्रीमान डॉ. बी. आर. आंबेडकर
४. श्री. के. एम. मुंशी
५. श्री. सय्यद मोहम्मद सादुल्लाह
६. श्री बी.उल. मित्तर
७. श्री. डी. पी. खैतान
मसुदा समितीची प्रथम बैठक 30 ऑगस्ट 1947 ला झाली त्यामध्ये डॉ आंबेडकर यांची मसुदा समितीच्या अध्यक्षपदी एक मताने निवड झाली.
27 ऑक्टोबर 1947 नंतर 13 फेबरुवारी 1948 पर्यंत समितीच्या एकूण 44 दिवशी सभा झाल्या. त्यामध्ये मसुद्याच्या प्रत्येक परिच्छेद/अनुच्छेद यावर विचार, उजळणी होवून पुनर्लेखन केले. यात डॉ. आंबेडकरांनी स्वतः जातीने सर्व कार्यभार सांभाळला.
मसुदा समितीने संविधानाचा प्रथम मसुदा 21 फेब्रुवारी 1948 रोजी संविधान सभेच्या अध्यक्षांना सादर केला.
संविधानाचा मसुदा 8 महीने पर्यंत लोकांच्या चर्चेसाठी उपलब्ध होता, समिती वेळोवेळी सुचवलेल्या संशोधनावर विचार करत होती.
त्यानंतर हा मसुदा 4 नोव्हेंबर 1948 रोजी संविधान सभेपुढे चर्चेसाठी सादर करण्यात आला.
वरील माहिती भारताचे संविधान (94 व्या सुधारणे पर्यंत अद्ययावत) उद्देशिका, अनुच्छेद 1 ते 395 आणि बारा अनुसूची सहित संपूर्ण संविधान, मिलिंद प्रकाशन वर्धा. याचे आधारे लिहिली आहे.
Dr. Surekha Bhagyawant
Leave A Comment