संविधानाच्या प्रतीमध्ये पान 64 ते 69 पर्यन्त भारतीय संविधान सभेच्या अध्यक्षांना, मसुदा
समितीचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले पत्र दिले आहे.

यामध्ये सार्वभौम, बंधुता, भारत राज्यांचा संघ असणे, नागरिकत्व, मूलभूत अधिकार, संघराज्याच्या राष्ट्रपतीचे अधिकार, समवर्ती सूची संबंधी शासनांगाचे अधिकार, राज्यसभेची जडणघडण, संसदेच्या सभागृहाचा आणि राज्य विधान मंडळाचा कालावधी, सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालये, राज्यपालांच्या चयनाच्या पद्धती, उपराज्यपाल, केंद्रशासित प्रदेश, विधानमंडळाच्या अधिकारांचे वितरण, वित्त व्यवस्था, सेवा, निवडणुका व मतदानाचा अधिकार, संविधान संशोधन, अल्पसंख्यांकाकरिता संरक्षक प्रावधाने आणि भाषिक प्रांत अशा काही बाबींच्या संदर्भात परिवर्तने सुचवणे आवश्यक वाटल्याने डॉ. आंबेडकरांनी संविधान सभेचे लक्ष या महत्त्वाच्या परिवर्तनाकडे वेधले आहे.

त्यानंतर पुढे संविधान प्रतीमध्ये
भाग 1: संघराज्य व त्याचे राज्यक्षेत्र
भाग 2: नागरिकत्व
भाग 3: मूलभूत हक्क
भाग 4: राज्य धोरणांची निदेशक तत्त्वे
भाग 5: संघराज्य, पाच प्रकरणांचा समावेश
भाग 6: राज्ये , सहा प्रकरणांचा समावेश
भाग 7: पहिल्या अनुसूची च्या मधील राज्ये
भाग 8: संघ राज्यक्षेत्रे
भाग 9: पंचायती
भाग 10: अनूसूचित क्षेत्रे व जनजाति क्षेत्रे
भाग-11: संघराज्य आणि राज्ये यांमधील संबंध, दोन
प्रकरणांचा समावेश
भाग-12: व्यवस्था मालमत्ता संविदा आणि दावे
प्रकरणांचा समावेश
भाग-13: भारताच्या राज्य क्षेत्रातील व्यापार, वाणिज्य
आणि व्यवहार संबंध
भाग-14: संघराज्य आणि राज्य यांच्या नियंत्रणाखाली
असलेल्या सेवा, दोन प्रकरणे आणि भाग चौदा
चा समावेश
भाग 15: निवडणुका
भाग-16: वर्ग संबंधी विशेष तरतुदी
भाग 17: राजभाषा प्रकरणांचा समावेश
भाग 18: आणीबाणी संबंधी तरतुदी
भाग 19: संकीर्ण
भाग 20: संविधानाची सुधारणा
भाग-21: अस्थायी, संक्रमणी व विशेषत तरतुदी
भाग 22: संक्षिप्त नाव, प्रारंभ, प्राधिकृत हिंदी पाठ व
निरसने
अनुसूच्या: एकूण बारा अनुसूची
शिवाय
संदर्भसूची आणि
संविधान सुधारणा सूची
इत्यादी बाबींचा सविस्तर समावेश आहे.

वरील माहिती भारताचे संविधान (94 व्या सुधारणे पर्यंत अद्ययावत) उद्देशिका, अनुच्छेद 1 ते 395 आणि बारा अनुसूची सहित संपूर्ण संविधान, मिलिंद प्रकाशन वर्धा. याचे आधारे लिहीली आहे

Dr. Surekha Bhagyawant